1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (15:13 IST)

वारीस पठाणचा शीरच्छेद करणाऱ्याला 11 लाखांचे इनाम

Waris Pathan
एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे परंतू पठाणचा  शीरच्छेद करणार्‍याला 11 लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेने केली आहे. 
 
वारीस पठाण देशद्रोही असल्याचं हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे. वारीस पठाण यांच्या तोंडी देशद्रोह्यांची आणि पाकिस्तानाची भाषा आहे. ही बाब आम्ही कधीही सहन करणार नाही असंही हाश्मी यांनी म्हटलं आहे.
 
वारिस पठाण यांना माध्यमांवर बोलण्याची बंदी घालण्यात आली आहे. पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. 
 
गुलबर्गा येथील सभेत बोलताना “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. ”आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर ते मिळवावे लागेल” असा इशारा दिल्याने वारीस पठाणवर चहूबाजूंनी टीका झाली. 
 
दरम्यान वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध मुस्लीम संघटनांनीही नोंदवला आहे.