सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठींबा

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी शिव स्वराज्य पक्षाचे प्रमुख हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या मतांमुळेच मतविभाजन होऊन शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या मदतीची परतफेड म्हणूनच एमआयएमने जाधव यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. 
 
एमआयएमने या निर्णयातून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सोबतच एमआयएमला मुस्लिमेत्तर समाजामध्ये देखील काही प्रमाणात समर्थन मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. याचा फायदा औरंगाबाद पूर्व मध्ये गफार कादरी यांन होऊ शकतो, असंही बोललं जात आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.