गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2024 (12:19 IST)

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

noodles
उत्तर प्रदेशमध्ये नूडल्स खाल्यानंतर 12 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचे पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार नूडल्स खाल्ल्यानंतर फूड पोईंजन झाल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. अधिकारींनी सांगितले की, नूडल्स खाल्ल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे कारण तिथून इतर जणांनी देखील नूडल्स घेतले होते ते त्या सर्वांची प्रकृती बिघडली आहे. 
 
उत्तर प्रदेशातील पिलभीत मध्ये नूडल्स खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 6 लोकांची प्रकृती बिघडली आहे. या कुटुंबात सहा जण आहेत व हे पूर्व रुग्णालयात भर्ती असून त्यामध्ये 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 
 
पूरनपुर परिसरात रात्री नूडल्स खाल्यानंतर कुटुंबातील लोक आजारी पडलेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकारींनी सांगितले की, 12 वर्षाच्या या लहान मुलाची प्रकृती बिघडली व काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, फूड पोईंजन झालेले 5 व्यक्ती रुग्णालयात भर्ती झालेत. ज्यामध्ये 4 जणांची प्रकृती स्थिर असून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. 
 
या प्रकरणात सहाय्य्क आयुक्त खाद्य शशांक त्रिपाठी म्हणाले की, कुटुंबाने जनरल स्टोर मधून विकत घेतलेले एका विशेष ब्रँडचे नूडल्स खाल्ले होते. पण काही इतर लोकांनी देखील त्याच ब्रँडचे नूडल्स विकत घेतले पण त्यांना काहीही आरोग्याची समस्या झाली नाही. तसेच ते म्हणाले की, आशंका व्यक्त होते आहे की, नूडल्सच्या व्यतिरिक्त काही इतर प्रकारचे पदार्थ जेवणात खाल्ल्याने देखील कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. तसेच त्रिपाठी म्हणले की, कुटुंबातील सदस्यांनी या बाबत कोणतीही तक्रार नोंदवली नाही.