1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2024 (10:42 IST)

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

rain
महाराष्ट्रात वातावरण बदलले आहे. राज्यभरात तापमान कमी झाले आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. पुणे, लातूर, नाशिक, नांदेड, महाबळेश्वर सोबत अनेक ठिकाणी मोठा पाऊस पडला आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . 
 
हवामान विभागाने राज्यामध्ये येत्या 4-5 दिवसांमध्ये वादळ, वारे, वीज सोबत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान काही स्थानांवर ओला दुष्काळ पडण्याची शकयता आहे आणि ऑरेंज अलर्ट घोषित केला गेला आहे. 
 
तर, मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा, विदर्भ काही भाग, दक्षिण कोकण मधील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. या भागांमध्ये 3-4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये मागील 2-3 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पुणे, कोल्हापुर, सतारा, नाशिक, सांगली, जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भक्षेत्रांमधील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. 
 
आईएमडीचे एक वरिष्ठ वातावरण वैज्ञानिक यांच्या मते, वर्तमान मध्ये एक ट्रफच्यामुळे असे वातावरण सिस्टम बनले आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हवा- शुष्क आणि ओली हवेचे इंटरैक्शन होत आहे.  तसेच मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 
 
हवामान विभागाने पुढील  48 तासांमध्ये मुंबई सोबत पूर्ण कोकणामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जेव्हा की ठाणे, रायगड आणि रत्नागिरीकरीता येलो अलर्ट घोषित केला आहे, जिथे वादळ, वारे, वीज सह पाऊस पडण्याची शक्यता आहे.