रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (11:34 IST)

विजेचा धक्का लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

child death
राजधानी दिल्लीत एका 12 वर्षाच्या मुलाचा विजेच्या खांबाला लटकलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला. तसेच विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या मुलाचे वडील हे पाकिस्तानचे स्थलांतरित असून ते भंगाराचा व्यवसाय करतात. तसेच वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मैदान गढी येथील भाटी माईन्सजवळ दक्षिण दिल्लीतील उघड्या तारांबाबत ऑगस्टमध्ये दाखल केलेल्या तक्रारीचा दाखला त्यांनी दिला.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 4 सप्टेंबर रोजी घडली जेव्हा हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत संजय कॉलनीतील घराजवळ खेळत होता. अधिकारींनी सांगितले की, "तो जवळच्या विद्युत खांबावरून येणाऱ्या  वायरच्या संपर्कात आला. तसेच त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.