1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. 13 killed in road accident in Jharkhand

झारखंड राज्यात रामगढमध्ये भीषण रस्ते अपघात, १३ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये काल रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आणि दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून दोन्ही वाहने जप्त केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमधील रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातात चार मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला. रामगढ जिल्ह्यातील पांकी परिसरात पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीची अज्ञात वाहनाशी टक्कर होऊन हा अपघात घडला. स्कॉर्पिओमध्ये एकूण १४ जण होते, त्यापैकी १३ जणांचे मृतदेह सापडले असून एका जखमी व्यक्तीला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडकेचा परिणाम इतका भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला.
रामगडचे एसडीपीओ आलोक रंजन यांनी अपघाताला दुजोरा दिला आणि सांगितले की, सर्व १३ बळी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील जंगारोन गावचे रहिवासी होते. त्यांच्या सामानात सापडलेल्या आधार कार्डांवरून त्यांची ओळख पटली. हे १४ बळी रामगड जिल्ह्यातील राजरप्पा मंदिरात पूजा करण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. मृतांमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती, तिला रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी वेळीच वाचवून रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
पुढील लेख
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर शौच्चालयात ६० वर्षीय महिलेवर बलात्कार, २५ वर्षीय आरोपीला अटक