Online Gaming १३ वर्षीय मुलाने गेममध्ये वडिलांच्या खात्यातून गमावले १४ लाख रुपये; नंतर प्राणघातक पाऊल उचलले
लखनऊमध्ये १३ वर्षीय लहान मुलाने ऑनलाइन गेम फ्री फायरच्या जाळ्यात अडकल्यानंतर आत्महत्या केली. घर बांधण्यासाठी शेती विकल्यानंतर त्याच्या वडिलांनी बँकेत ठेवलेले १४ लाख रुपये त्याने गमावले. यामुळे तो घाबरला. कुटुंबातील सदस्यांच्या भीतीने त्याने हे भयानक पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार राजधानी लखनऊमध्ये ऑनलाइन गेम फ्री फायर खेळून वडिलांचे १४ लाख रुपये गमावल्यानंतर १३ वर्षीय निष्पाप मुलाने आत्महत्या केली. तो ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकला. जिंकण्याच्या लोभात किंवा गमावलेले पैसे परत मिळविण्याच्या लोभात त्याने अवघ्या दीड महिन्यात मोठी रक्कम गमावली. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की यशला फ्री फायर गेमचे व्यसन लागले होते. तो शाळेतून परत येताच मोबाईल फोन घेऊन बसायचा. तसेच रात्री १० च्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना हे कळले. आत्महत्या करण्यापूर्वी यशने फोन रिसेट केला होता.
Edited By- Dhanashri Naik