सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

३१ तासानंतर चकमक संपली, दोन दहशतवादी ठार

गेल्या ३१ तासांच्या चकमकीनंतर जम्मू- काश्मीर येथील श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 
 
श्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळावर सोमवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पहाटे साडे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तळात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहारेकऱ्याला बॅकपॅक आणि शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्याने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ व्या बटालियनमधील एक जवान शहीद झाला होता. जवानांकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर दहशतवाद्यांनी करण नगरातील एका पडक्या घरात आश्रय घेतला. यानंतर सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला होता. मंगळवारी दुपारपर्यंत ही चकमक सुरु होती.