शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

महिला पायलटचे प्रसंगावधान, मोठी विमान दुर्घटना टळली

एअर इंडियाची महिला पायलट अनुपमा कोहलीने प्रसंगावधान दाखवले  आणि मोठी विमान दुर्घटना टळली. एअर ट्रॅफीक कंट्रोलर्स (एटीसी) कडून कोऑर्डिनेशन करताना काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे विमानांना योग्य ते संदेश मिळाले नाहीत. दरम्यान, दोन्ही विमाने अत्यंत जवळ आली.

काही क्षण प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही पायलट्सनी मोठ्या कुशलतेने परिस्थिती नियंत्रणात आणली.  ही घटना एअर इंडियाचे विमान क्रमांक ए-३१९ (मुंबई ते भोपाळ) आणि ए-३२० (दिल्ली  ते पुणे) दरम्यान घडली.