गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (09:28 IST)

कानपूरजवळ साबरमती एक्स्प्रेसचे 20 डबे रुळावरून घसरले

train accident
वाराणसीहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे 20 डबे शनिवारी पहाटे कानपूरमधील गोविंदपुरी स्टेशनजवळ रुळावरून घसरले. तसेच सध्या तरी या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याची बातमी अजून नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे झाला. कानपूर ते भीमसेन रेल्वे स्टेशनदरम्यान साबरमती एक्स्प्रेसचे 20 डबे रुळावरून घसरल्याचे त्यांनी सांगितले. पण सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
 
तसेच ड्रायव्हरच्या चौकशीत समोर आले की, रेल्वेच्या इंजिनवर मोठा दगड आदळला होता, ज्यामुळे हा अपघात झाला असावा. त्यांनी सांगितले की, ट्रेनच्या इंजिनच्या पुढच्या भागात प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी लावलेला 'कॅटल गार्ड' खराब झाला होता आणि वाकला होता. अपघातामुळे सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

तसेच प्रवाशांना बसने कानपूर सेंट्रल स्टेशनवर पाठवण्यात आले आहे, तेथून त्यांना त्यांना जिथे जायचे तिथे पाठवले जाईल. "तसेच, आठ डब्यांची एक मेमू ट्रेन कानपूरहून अपघाताच्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती जेणेकरून प्रवाशांना कानपूरला आणून त्यांना पाठवण्याची व्यवस्था करता येईल,"  
 
तसेच मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामुळे कानपूर-झाशी मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे, ती सुरळीत करण्यासाठी रेल्वे तांत्रिक अधिकाऱ्यांची एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.  

Edited By- Dhanashri Naik