रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (21:25 IST)

Uttar Pradesh : शरीरावर उमटले राम-राधे!

Radhe Radhe
social media
हरदोई जिल्ह्यातील माधौगंज कोतवाली भागात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर राम आणि राधे हे शब्द उमटले आहे . शाळेत हा प्रकार घडल्यानंतर कुटुंबीयांना याची माहिती फोन द्वारे दिली.  त्यानंतर असे समोर आले की, हा प्रकार  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून डॉक्टरही या बद्दल काहीच सांगू शकत नाहीत.
 
सहिजना राहणारे  देवेंद्र राठोड यांची मुलगी साक्षी (8) ही माधौगंज  शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता पाहिलीत  शिकते.तिच्या अंगावर राधे-राधे, राम-राम, गुरुदेव यांच्यासह त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि क्रमांक उमटत आहेत. देवेंद्रच्या म्हणण्यानुसार, गेल्या 20 दिवसांपासून साक्षी तिच्या शरीरावर ओरखड्यांसारख्या रेषा तयार होत होत्या.

आता तिच्या अंगावरील नाव उठून दिसू लागली आहेत. हरदोई येथील अनेक डॉक्टर आणि खासगी नर्सिंग होममध्ये साक्षीला दाखवले, पण डॉक्टर काहीही सांगू शकले नाहीत, असा देवेंद्रचा दावा आहे. सोमवारी शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी साक्षीच्या अंगावर राम, राधे, तिचे  नाव आणि इतर अनेक अक्षरे उमटली.

तिला कोणतीही वेदना किंवा खाज किंवा इतर कोणतीही समस्या नव्हती,
सुमारे 15 मिनिटांनंतर त्याच ठिकाणी असलेली त्वचा पूर्णपणे सामान्य झाली. साक्षीला कोणत्याही प्रकारचा वेदना किंवा खाज किंवा इतर कोणतीही समस्या नाही. डॉ. म्हणतात, त्वचेशी संबंधित आजार असू शकतो, मात्र सविस्तर चाचणीशिवाय काहीही सांगता येणार नाही









Edited by - Priya Dixit