बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (13:08 IST)

ओमिक्रॉन व्हेंरिएंटच्या धोक्याखाली येथे उघडणार 27 हजार प्रायमरी स्कूल

कोरोना व्हायरस आणि जलद गतीने वाढत असलेला व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका अजून टळलेला नाही. दरम्यान ओडिशा सरकारने राज्यातील 27,000 शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पटनायक सरकारच्या या निणर्य अंतर्गत पहिली वर्गापासून ते 5वी वर्गापर्यंतच्या शाळा 3 जानेवारीपर्यंत उघडण्यात येतील. शाळा सकाळी 9 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत उघडतील. राज्य शिक्षा मंत्री समीर रंजन यांनी सांगितले की 15 वर्षाहून अधिक वयाच्या सर्व विद्यार्थांना सरकारी गाइडलाइंस प्रमाणे लस देण्यात येईल.
 
आता ओडिशा सरकारने प्रायमरी वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे की इतर वर्ग 10 जानेवारीपासून सुरु होतील. सरकारकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की विद्यार्थी आपल्या पालकांच्या सम्मतीने शाळेत येऊ शकतात. ऑनलाइन क्लासेस देखील पूर्वीप्रमाणे सुरु राहतील.
 
शाळांमध्ये कोरोना संबंधी सर्व अहम गाइडलाइंसचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे. उल्लेखनीय आहे की अनेक राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रभाव बघत नवीन नियम जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शाळा पुन्हा बंद करण्याचा विचार केला जाता आहे. तसेच दिल्लीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे आणि अनेक अटीं जाहीर केल्या गेल्या आहेत.