गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (22:21 IST)

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

283 members exercised their right to vote for the presidential election
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत असलेल्या वेळेत २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी दिली.
 
केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर यांनी कामकाज पाहिले.