1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:15 IST)

येत्या २८ सप्टेंबरला भारत बंद

28th sept bharat band
येत्या शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली यांनी संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे. देशात किरकोळ व्यापार अस्थिर व उध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट- फ्लिपकार्ट करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोध करण्यासाठी बंद पुकारला आहे.  
 
‘वॉलमार्ट’,‘किसको-मॅट्रो’सारख्या मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत व युरोपमध्ये मोठे मॉल्स व दुकाने उघडली व परिणामी तेथील छोट्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत. अशा कंपन्यांकडे ८० ते ८५ टक्के व्यापार आहे व त्यांनी उत्पादकांची (शेतकरी व उद्योजक) आपल्या खरेदीच्या मक्तेदारीच्या आधारे पिळवणूक केली. तसेच ग्राहकांनाही खरेदीसाठी पर्याय उपलब्ध राहिले नाही. खरेदीच्या वेळी अडवणूक करून स्वस्तात माल घेणार. स्पर्धक नसल्याने एक प्रकारे हुकुमशाही सारखा कारभार असल्याचे सांगण्यात आले आहे.