रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (11:50 IST)

बालाकोट एअर स्ट्राईकची 3 वर्षे : IAF ने पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भीषण स्फोट झाला. सीआरपीएफच्या 78 गाड्यांच्या ताफ्यावर लक्ष होते. या स्फोटात 40 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशात दु:खाची आणि संतापाची लाट उसळली होती. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हा दहशतवादी हल्ला झाला असून या घटनेवरून राजकारणही तापले असे.
 
दोन आठवड्यांनंतर, मंगळवारी 26 फेब्रुवारी 2019 रोजी, भारतीय हवाई दलाच्या मिराज-2000 विमानाने रात्रीच्या अंधारात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली आणि बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर सर्जिकल स्ट्राइक केला, नंतर याला 'बालाकोट एअर स्ट्राईक' असे म्हटले गेले. या स्ट्राइकमध्ये मोठ्या प्रमाणात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षण, संघटनेचे प्रमुख कमांडर आणि फिदाईन हल्ल्याची तयारी करणारे जिहादी यांचा खात्मा करण्यात आला.या मध्ये मिराज-2000 विमानाने  1000 किलो बॉम्ब टाकले.या मध्ये 300 दहशतवादी मारले गेले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या लढाईत भारतीय हवाई दलाच्या मिग-21 ने पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 विमान पाडल्याचा दावा भारताने केला आहे. पाकिस्तानने मिग-21 हे विमान पाडले आणि विंग कमांडर अभिनंदनला अटक केली. मात्र, दबावाखाली दोन दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली.