गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (11:50 IST)

यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू

Aligarh News : उत्तर प्रदेशातीलअलीगढमधील यमुना एक्सप्रेसवेवर खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक जखमी झाले आहे.  याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हाअपघात मध्यरात्री घडला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगडच्या कृष्णा ट्रॅव्हल्सची डबल डेकर बस दिल्लीहून आझमगड आणि मऊकडे निघाली होती. पण बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री ही बस यमुना एक्स्प्रेस वेवरील मागून येणाऱ्या ट्रकला धडकली. या धडकेनंतर बसच्या एका बाजूचे तुकडे उडून गेले. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृतांमध्ये एक महिला वय 25 व तिचा पाच महिन्यांचा निष्पाप बालकाचा समावेश आहे.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. या घटनेबाबत अलीगढ पोलिसांनी सांगितले जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पाच मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik