मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (10:11 IST)

इंदिरा नगर मध्ये भीषण अपघातात 7 दगावले

7 killed in a horrific accident in Indira Nagar  Natioanl  Marathi News In Marathi Webdunia Marathi
इंदिरा नगर भागात काळ ने मोठा आघात केला.या भागात काल रात्री  भीषण अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे.या अपघातात एका आलिशान ऑडी कारचा चक्काचूर झाला आहे.या कार मध्ये बसलेल्या सात जणांचा दुर्देवी अंत झाला आहे.
 
 मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास तीन तरुणी आणि चार तरुण असलेली ही ऑडी कार बेंगळूर येथील इंदिरा नगर भागातून वेगाने जात असताना चालकाचे कार वरील नियंत्रण अचानक सुटल्याने कार इंदिरानगरच्या फुटपाथावर जोरानं आदळली.ही धडक इतकी जोरदार होती की या आलिशान ऑडी गाडीचा चक्काचूर झाला आहे.या मध्ये बसलेल्या सात जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका ने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.