'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' पोस्टरमध्ये नेहरुंचा फोटो नाही, काँग्रेस नेत्यांचा आक्षेप

congress
Last Modified रविवार, 29 ऑगस्ट 2021 (10:36 IST)
भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) 'स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव' यासंदर्भातील एक पोस्टर जारी केले आहे. यात जवाहरलाल नेहरु यांचा फोटो नसल्याने नवीन वादला सुरुवात झालीय. काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या पोस्टरचा फोटो ट्वीट केला आहे. यात महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस,भगत सिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल,राजेंद्र प्रसाद,मदन मोहन मालवीय आणि वीर सावरकर यांचे फोटो आहेत.मात्र नेहरुंचा फोटो नसल्याने त्यावर टीका केली जात आहे.

शशी थरुर म्हणाले, "हे केवळ निंदनीय नाही तर इतिहासाच्या विरोधात आहे. स्वातंत्र्याचा महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा आवाज राहिलेले जवाहरलाल नेहरु यांना हटवून साजरा केला जात आहे. पुन्हा एकदा आयसीएचआरने आपलं नाव खराब केलं आहे. ही एक सवय बनत चालली आहे!"
काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जयराम रमेश यांनी शशी थरुर यांचे ट्वीट रिट्वीट करत टीका केली आहे.

तर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या,"देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नसल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कमकुवत होत नाही.तर यावरुन हेच दिसते की भाजप आणि पंतप्रधान हे नेहरुंच्या कर्तृत्त्वाला किती घाबरतात. अशाप्रकरची असुरक्षेची भावना पंतप्रधानांना शोभा देत नाही."


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

मन की बात कार्यक्रमात पीएम मोदींचा इशारा, म्हणाले- कोरोना ...

मन की बात कार्यक्रमात पीएम मोदींचा इशारा, म्हणाले- कोरोना अजून गेलेला नाही, सावधगिरी बाळगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. ...

फ्युचर ग्रुप डीलमधील अनियमिततेबद्दल ईडीने अॅमेझॉन ...

फ्युचर ग्रुप डीलमधील अनियमिततेबद्दल ईडीने अॅमेझॉन इंडियाच्या प्रमुखाला समन्स बजावले
फ्युचर ग्रुपसोबतच्या करारातील कथित अनियमिततेबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अॅमेझॉन ...

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ , ...

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ , प्रकरणात नवीन खुलासा
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. ...

मन की बातमध्ये पीएम मोदींनी फ्लाइंग बोटचे सत्य सांगितले, ...

मन की बातमध्ये पीएम मोदींनी फ्लाइंग बोटचे सत्य सांगितले, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये मेघालयच्या फ्लाइंग बोटीचा ...

गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, मेलमध्ये दिल्ली पोलिसांचा ...

गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, मेलमध्ये दिल्ली पोलिसांचा उल्लेख
नवी दिल्ली. पूर्व दिल्लीतील भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा ...