शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (13:13 IST)

8 महिन्याच्या चिमुकल्याला 4 वर्षाच्या बहिणीने पाणी समजून डिझेल पाजलं

यूपीच्या नोएडा येथे 4 वर्षाच्या मुलीने चुकीने आपल्या छोट्या भावाला पाण्याऐवजी डिझेल पाजून दिलं. यामुळे 8 महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेला.
 
हे धक्कादायक प्रकरण नोएडा येथून समोर आले आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे नोएडाच्या सेक्टर-63 येथे छिजारसी कॉलोनीत ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्वजण झोपत होते. त्यावेळी 4 वर्षाच्या मुलीने पाणी समजून आपल्या 8 महिन्याच्या भावाला चुकीने डिझेल पाजलं.
 
काही वेळाने त्याची तब्बयेत खालवली तेव्हा सर्वांना कळले. त्याला लगेच चाइल्ड PGI मध्ये नेण्यात आले परंतु मुलाला वाचवता आले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.