1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (16:07 IST)

'नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गाने चालत राहिले तर...', सुबोधकांत सहाय यांचं धक्कादायक वक्तव्य

Subodh Kant Sahai
"नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गाने चालत राहिले तर त्यांनाही हिटलरचा मृत्यू येईल," असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुबोधकांत सहाय यांनी केलं आहे. नवी दिल्लीतल सुरू असलेल्या काँग्रेसच्या 'सत्याग्रह' आंदोलनात ते बोलत होते.
 
ते म्हणाले, "मोदी या देशात हुकुमशाहाप्रमाणे काम करतायत. त्यांनी हिटलरचा इतिहासही पार केला. हिटलरनेही अशीच एक संस्था बनवली होती. त्याचं नाव खाकी होतं. मोदी हिटलरच्या मार्गाने चालत राहिले तर हिटलरप्रमाणे मृत्यू होईल."
 
नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींनी सुरू असलेली ईडीची चौकशी आणि 'अग्नीपथ' योजनेला विरोध करण्यासाठी सोमवारी (20 जून) दिल्लीत काँग्रेसने 'सत्याग्रह' आंदोलन पुकारलं आहे.
 
भाजपने अनेक राज्यात आमच्या सत्तेत आलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न केला, अशीही टीका सुबोधकांत सहाय यांनी केलीय.