शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (21:11 IST)

Building Collapses in Delhi: पहाडगंजमध्ये इमारत कोसळली

देशाची राजधानी नवी दिल्लीतील पहाडगंज परिसरात एक इमारत कोसळली आहे. हा परिसर नवी दिल्ली रेल्वे स्थानकाजवळ आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहाडगंजमधील खन्ना मार्केटमध्ये ही घटना घडली असून, खन्ना सिनेमा हॉलच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे.
 
दिल्ली अग्निशमन विभाग आणि दिल्ली पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 2 मुले आणि 1 तरुणाची सुटका करण्यात आली आहे. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर बचावलेली दोन मुले आणि एका तरुणाला लेडी हार्डिंज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकल्याची माहिती आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या अपघातस्थळी हजर आहेत.