शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (21:15 IST)

आसाममध्ये पुरामुळे प्रचंड उद्ध्वस्त, दिहिंग नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला

aasam
आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. दिहंग नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे बुधवारी बक्सा जिल्ह्यातील सुबनखाता भागात दिहिंग नदीवरील पूलही कोसळला. न्यूज एजन्सी एएनआयने या खराब झालेल्या पुलाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पूल कोसळल्यामुळे दोन्ही बाजूला लोक उभे असल्याचे दिसत आहे.
 
दुसरीकडे, आसामच्या उदलगुरी जिल्ह्यातील कलईगाव-उदलगुरीला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भागही नोआ नदीत वाहून गेला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी करीमगंजमध्ये ऑटो रिक्षावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला. याआधी मंगळवारी भूस्खलनाच्या घटनेत ढिगाऱ्याखाली चार जण जिवंत गाडले गेले. 17 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुवाहाटीमध्येही अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या बातम्या आल्या आहेत. गुवाहाटीच्या कामाख्या, खारघुली, हेंगराबारी, सिलपुखरी आणि चांदमारी कॉलनीमध्ये दरड कोसळल्या आहेत.
 
शाळा-कॉलेज 18 जूनपर्यंत बंद
तामुलपूर जिल्ह्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात हजार नागरिक बाधित झाले आहेत. बरोलिया, पगलाडिया आणि मोटोंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, त्यामुळे केक्रीकुची, द्वारकुची, बोडोलँड चौक या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांना घरे सोडावी लागली आहेत. शुक्रवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दिमा हासाओ जिल्ह्याचे उपायुक्त आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अध्यक्षांनी 18 जूनपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.