मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (10:49 IST)

भुयारी बोगद्याची भिंत कोसळल्याने 9 मजूर अडकले, बचाव कार्य सुरु

मध्य प्रदेशातील जबलपूरपासून 50 किमी अंतरावर असलेल्या स्लीमनाबादमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे नर्मदा नदीच्या उजव्या तीरासाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्याची भिंत कोसळल्याने 9 मजूर दाबले गेले. कामगार अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर कटनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जबलपूरचे प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफच्या पथकाने तीन मजुरांची सुटका केली आहे. 6 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.  
 
सर्व मजुरांची सुटका करण्यात आली असून, बचाव आणि मदतीसाठी जबलपूर जिल्ह्यातून टीम पाठवण्यात आली आहे. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित 6 मजुरांना लवकरच बाहेर काढण्यात येईल.