चालत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीवर चालत्या रुग्णवाहिकेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून समोर आली आहे. 22 नोव्हेंबर रोजी '108' आपत्कालीन सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेत बलात्काराची ही धक्कादायक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील चार आरोपींपैकी चालकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही मुलगी तिची बहीण आणि मेव्हण्यासोबत रुग्णवाहिकेतून प्रवास करत होती, असेही पोलिसांनी सांगितले आहे. पण, त्यापैकी एकही रुग्ण नव्हता. रुग्णवाहिकेत तिघांव्यतिरिक्त चालक आणि त्याचा सहकारीही उपस्थित होता.
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन पिडतेची बहीण आणि जिजाजीवर लैंगिक अत्याचार गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Edited By- Dhanashri Naik