रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024 (18:16 IST)

नागालँडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

earthquake
Nagaland News : नागालँडमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार नागालँडमधील किफिरे जिल्ह्यात आज सकाळी 7.22 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजली गेली.
 
तसेच भूकंपानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. पण भूकंपानंतर मोठे नुकसान झाल्याची बातमी नाही. स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी किंवा भूस्खलनाची नोंद केलेली नाही.
 
तसेच भूकंपाची तीव्रता 3.8 असल्याने हा सौम्य भूकंप होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोणतीही हानी झाली नाही. तरीही भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भयभीत झाले आणि अनेकजण घराबाहेर पडले. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By- Dhanashri Naik