सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (09:59 IST)

कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 5 डॉक्टरांचा मृत्यू

Kannauj News : आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवे वर बुधवारी पहाटे एक मोठा अपघात झाला. या अपघातात सैफई वैद्यकीय विद्यापीठातील 5 डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व डॉक्टर लखनौहून परतत असताना आज पहाटे  अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह विद्यापीठाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
 
मिळालेल्या माहितीनुसार या सर्व मृतांची ओळख पटली आहे. हे सर्व डॉक्टर एका लग्नात सहभागी होण्यासाठी लखनौला गेले होते. मंगळवारी रात्री ते कारने सैफईला परतत असताना लखनौ एक्स्प्रेसमध्ये त्यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की 5 डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला.
 
मृत्यू झालेल्या डॉक्टरांमध्ये डॉ. अनिरुद्ध वर्मा, डॉ. संतोष कुमार मौर्य, डॉ. अरुण कुमार, डॉ. जयवीर सिंग आणि डॉ. नरदेव यांचा सहभाग आहे. हे सर्वजण लखनौमध्ये एका लग्नातून परतत होते, त्यादरम्यान डॉक्टरांची कार आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील मधला दुभाजक ओलांडून पलीकडे पोहोचली आणि त्यानंतर मागून एक भरधाव ट्रक येत होता, त्यामुळे ट्रकची कारला धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विद्यापीठाला डॉक्टरांची ओळख कळवण्यात आली. यासोबतच मृत सर्व डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली, त्यानंतर सर्वजण घटनास्थळी पोहोचले.हे सर्व डॉक्टर पीजीचे शिक्षण घेत होते. या अपघाताचे मुख्य कारण दाट धुके असल्याचे सांगितले जात आहे.