मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (15:52 IST)

मद्यधुंद ट्रक चालकाने झोपलेल्या लोकांना चिरडले, 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

काळ कधी आणि कोणावर झडप घालेल हे सांगू शकत नाही. असे काहीसे घडले आहे केरळच्या त्रिशूर मध्ये येथे गाढ झोपेत झोपलेल्या लोकांवर चक्क ट्रक चढला आणि या अपघातात दोन चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहे. 

सदर घटना वालपाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाटिका येथे भटके राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला डझनभर लोक झोपलेले असताना त्यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने पहाटे 4 वाजेच्या सुमारास ट्रक चढवला या मध्ये दीड ते चार वर्षाची दोन मुले आणि दोन महिलांचा मृत्यू झाला.

हा ट्रक कन्नूर येथून लाकूड घेऊन येत असताना ट्रक चालक आणि क्लिनर दोघे मद्यधुंद अवस्थेत होते आणि ट्रक विना परवाना असलेला क्लिनर चालवत होता. त्याचे ट्रॅकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने ट्रक झोपलेल्या लोकांवर चढवला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

सर्व जखमींवर त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit