शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (10:50 IST)

17 वर्षांची मुलगी 12 वर्षाच्या मुलाची आई झाली..

rape
तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या 12 वर्षांच्या मुलावर 17 वर्षांच्या मुलीला गरोदर केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी या दोघांचे प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा मिरसुदार शासकीय रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांना मिळाली.
 
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मुलीचे काही वर्षांपासून एका 12 वर्षांच्या मुलासोबत संबंध असल्याचे समोर आले. यामुळे मुलगी गरोदर राहिली आणि त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला पॉस्को कायद्यानुसार अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला तंजावर बाल सुधारगृहात पाठवले आहे. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.