1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (13:08 IST)

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

child death
ऊत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका चिमुकल्याचा मृतदेह त्याच्याच घरातून मिळाला आहे. मृतदेहाजवळ एका कागदावर लिहले होते की, 'अब शांति मिली, आत्मा को शांति मिले'. तर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.  
 
मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका चिमुकल्याचा मृतदेह मिळाला आहे. 5 वर्षाच्या या मुलाचा मृतदेह त्याच्याच घरात मिळाला आहे. तसेच त्याचा घरात भीतीवर कागदावर लिहून ठेवले होते की,  'अब शांति मिली, आत्मा को शांति मिले'. पसरीसरातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच घरातून तंत्र-मंत्र, चा सामान देखील मिळाला आहे. 
 
हे प्रकरण मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली तालुक्यातील कैलावडा गावातील आहे. इथे एका घरात चिमुकल्याचा मृतदेह सापडला असून त्याला पाहून कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. पोलिसांना चिमुकल्याच्या मृतदेहाजवळ काही सामान देखील मिळला आहे. पोलीस या प्रकरणाला तांत्रिक क्रियेशी जोडून तपास करीत आहे.