गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2024 (14:31 IST)

अयोध्यावरून परतत असणारी श्रद्धाळुंची बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकली, चार जणांचा मृत्यू

Accident
गाजीपूर मध्ये बारसेना परिसरात मुससेपूर गावाजवळ आज सकाळी श्रद्धाळूंनी भरलेली बस थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहे. 
 
पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. युपीडा कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
बिहार मधील भोजपूर मधील करथा गावामधून आठ जूनला अयोध्या दर्शन करण्यासाठी श्रद्धाळूंनी भरलेली बस निघाली होती. अयोध्यामध्ये दर्शन, पूजापाठ केल्यानंतर ही बस बिहारच्या दिशेने परतत होती. पूर्वांचल एक्प्रेस-वे च्या मुससेपूर गावाजवळ पोहचली. पण बस चालकाला झोपेची गुंगी आल्याने त्याच्या ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रेलवर धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये बसचा पुढचा भाग खूप खराब झाला. तर बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात तीन जण तर एका महिला यांच्या जागीच मृत्यू झाला.