रविवार, 8 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 जानेवारी 2026 (15:51 IST)

श्वासनलिकेत अडकल्याने फुग्याने घेतला चिमुरड्याचा जीव

श्वासनलिकेत अडकल्याने फुग्याने घेतला चिमुरड्याचा जीव
ओडिशातील एका मुलाला फुगा फुगवताना आपला जीव गमवावा लागला. फुगा मुलाच्या तोंडात शिरला आणि त्याच्या श्वासनलिकेत अडकला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार खुर्दा जिल्ह्यातील निधीपूर गावात घटना उघडकीस आली आहे. चिप्सच्या पॅकेटमध्ये सापडलेल्या एका लहान फुग्याने सहा वर्षांच्या मुलाचा बळी घेतला. मृत मुलाचे नाव तापस पैकराई असे आहे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तापस घरी चिप्स खात असताना त्याला पॅकेटमध्ये एक लहान फुगा सापडला. तो त्याने तोंडाने फुगवण्याच्या प्रयत्न केला, परंतु फुगा अचानक त्याच्या घशात अडकला.
फुगा घशात अडकताच मुलाला श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. घाबरलेल्या कुटुंबाने त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलाच्या घशातून फुगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  
Edited By- Dhanashri Naik