मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरले, रेल्वे सेवा प्रभावित
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात बुधवारी एक मालगाडी रुळावरून घसरली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या वॉल्टेअर विभागातील कोठावलासा-किरांडुल मार्गावरील चिमिडीपल्ली स्टेशनजवळ लोहखनिज वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरले.
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील चिमिडीपल्ली रेल्वे स्टेशनजवळ एका मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरले. दुपारी लोहखनिज वाहून नेणारी मालगाडी छत्तीसगडमधील किरांडुल येथून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जात असताना ही घटना घडली. या अपघातामुळे विशाखापट्टणम-किरांडुल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
वॉल्टेअर विभागातील अराकू-कोट्टावलसा विभागातील चिम्मीडीपल्ली रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी १ वाजता मालगाडीच्या एकूण ५० पैकी किमान २५ डबे रुळावरून घसरले, असे पूर्व किनारपट्टी रेल्वेने (ECoR) एका निवेदनात म्हटले आहे. दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू व्हावे यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी तातडीने मदत रेल्वे रवाना करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik