1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (09:12 IST)

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

bus fire
social media
तावडू उपविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी-शनिवारी रात्री भाविकांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. बसमध्ये प्रवास करणारे आठ जण जिवंत जळाले, तर दोन डझनहून अधिक जण गंभीररीत्या भाजले. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालत्या बसमध्ये आग लागल्याचे पाहून स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. अपघातात बळी पडलेले पंजाब आणि चंदीगडचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे जे मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन परतत होते. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
बस मध्ये प्रवास करणाऱ्यांनी सांगितले की,गेल्या शुक्रवारी त्यांनी पर्यटक बस भाड्याने घेतली होती आणि बनारस आणि मथुरा वृंदावन दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 60 जण होते. हे सर्वजण जवळचे नातेवाईक होते जे पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. शुक्रवार-शनिवारी रात्री दर्शन घेऊन ते परतत होते. रात्री दीडच्या सुमारास बसमध्ये ज्वाळा दिसत होत्या. तिने सांगितले की ती समोरच्या सीटवर बसली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. 
आगीची माहिती मिळतातच काही लोकांनी आणि त्यांनी आरडाओरड करून बस चालकाला बस थांबवायला सांगितले मात्र बस थांबली नाही. 

नंतर मोटारसायकलवरून आलेल्या तरुणाने बसचा पाठलाग करून चालकाला आगीची माहिती दिली. यानंतर बस थांबली मात्र तोपर्यंत बसमधील आग खूपच तीव्र झाली होती.आणि सर्वत्र पसरली होती. 
 
गावकऱ्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांनाही कळवले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तोपर्यंत बसमधील लोक चांगलेच जळाले होते, त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला होता. तावडू सदर पोलीस स्टेशनने रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात पाठवले. 
यावेळी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

Edited by - Priya Dixit