रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

ganesha idol
Budhwar Upay सनातन धर्मात बुधवारचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषाच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान करण्यासाठी बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. मान्यतेनुसार श्रीगणेशाची यथोचित पूजा केल्याने भक्ताला सौभाग्य आणि उत्पन्नात वाढ होते. तसेच शुभ कार्यात यश मिळते.
 
हिंदू धर्मात बुधवार हा भगवान शिवाचा पुत्र गणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना व उपवास करण्याचा विधी आहे. ज्योतिष शास्त्रात श्रीगणेशाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय करण्याचा नियम आहे. जीवनातील आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर बुधवारी येथे सांगितलेले उपाय अवश्य करा.
 
बुधवार उपाय Budhwar Ke Upay
-जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर बुधवारी सकाळी स्नान करून श्रीगणेशाची पूजा करा. या दरम्यान खालील मंत्राचा 21  वेळा जप करा आणि देवाला नारळ अर्पण करा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

- आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर गणेशाला विधीपूर्वक अभिषेक करून त्याची पूजा करून विशेष नैवेद्य दाखवावा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने आर्थिक समस्या दूर होतात.
 
-व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती मिळवण्यासाठी बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर तुमच्या भक्तीनुसार एखाद्या गरीब व्यक्तीला मूग डाळ दान करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो. त्यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये वाढ होते.
 
- तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बुधवारी पूजेदरम्यान गणेशाला दुर्वा आणि शमीची पाने अर्पण करा. दर बुधवारी हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्रीगणेश प्रसन्न होतात.