सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (19:13 IST)

रस्ता अपघातात पिकअप व्हॅन 20 फूट खोल दरीत कोसळली, 4 ठार, 15 जखमी

पिकअप व्हॅन दरीत कोसळून पडून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात 15 जण जखमी झाले. यातील 9 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अरुणाचल प्रदेशातील करा दादी जिल्ह्यात झाला आहे. 
 
पिकअप व्हॅन स्वार ताली ते पली येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. कार रस्त्यावरून घसरली आणि कुमाऊ नदीजवळील 20 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात चार महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. त्यात 9 जण जखमी झाले. त्यापैकी 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. गंभीर जखमींना इटानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरितांना पली कडे पाठवण्यात आले आहे. 
 
एसपीने सांगितले की, बसमध्ये चालकासह चार जण होते. बाकी सर्व महिला प्रवासी होत्या. बोहू पोयुम, निक नेनिया, टोकू याची आणि गोदु नायक अशी मृतांची नावे आहेत. पिकअप व्हॅन डोंगरावर चढत असताना हा अपघात झाला, अशी माहिती ताली मंडळ अधिकारी जीना बगांग यांनी दिली. यादरम्यान पिकअप अनियंत्रितपणे खाली  घसरून दरीत कोसळली. 
 
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लिहिले की, कुआ ब्रिज पॉइंटजवळ झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळाली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना. आणि जखमी लवकर बरे होवो ही प्रार्थना. यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीतून सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे