शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (16:00 IST)

धक्कादायक : विद्यार्थ्याने स्वतःला सुपरमॅन समजत चौथ्या मजल्यावरून मारली उडी

तामिळनाडूतील कोईम्बतूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विद्यार्थीने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार त्याने हे केले कारण त्याला वाटले की त्याच्याकडे सुपर पॉवर आहे आणि त्याला काहीही होणार नाही. सुदैवाने या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले असून त्यांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.  
 
तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या प्रकरणी चेट्टीपलायम पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. या विद्यार्थ्याने असे धोकादायक पाऊल का उचलले आणि त्यांची मानसिक स्थिती काय होती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.  

Edited By- Dhanashri Naik