बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 जून 2024 (09:09 IST)

वाळूने भरलेला ट्रक झोपडीवर उलटला, एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

accident
काळ कधी आणि कुठे झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली.उत्तरप्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील मल्लवान कोतवाली भागात उन्नाव मार्गावर  वाळूने भरलेला ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीत झोपलेल्या चार निष्पाप मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांची चार मुले आणि एका जावयाचा समावेश आहे. एक मुलगीही जखमी झाली आहे.
 
मल्लवान शहरातील उन्नाव रोडवरील चुंगी क्रमांक 2 जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये नाट समाजाचे लोक राहतात. मंगळवारी मध्यरात्रीनंतर कानपूरहून हरदोईकडे जाणारा वाळूने भरलेला ट्रकवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

अपघाताची माहिती मिळतातच स्थानिकांनी पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने ट्रक सरळ केला आणि वाळू बाजूला केली तो पर्यंत कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला होता.पोलिसांनी ट्रक चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले आहे. 
 
Edited by - Priya Dixit