सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (10:49 IST)

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळली

उत्तर प्रदेशातील सक्ती शहरात बातमी समोर आली आहे. आज शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन सोन नदीत कोसळली. तसेच शाळेच्या या व्हॅनमध्ये सुमारे 15 विद्यार्थी शाळेत जाण्याकरिता बसले होते. 
 
तसेच हा अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हसौद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसौद येथे ही घटना घडली आहे. तसेच ही व्हॅन हसौदच्या खासगी शाळेची आहे.   

तसेच असे सांगण्यात येत आहे की जलद गतीने वाहन चालविल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन नदीत कोसळली. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सध्या सर्व विद्यार्थी सुदैवाने सुखरूप आहे.

Edited By- Dhanashri Naik