रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (16:02 IST)

मलेशियाहून भारतात येणाऱ्या विमानात महिलेचा मृत्यू

Tamil Nadu News : मलेशियाहून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच हे विमान मलेशियाची राजधानी क्वालालंपूरहून तामिळनाडूतील चेन्नईला येत होते. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी विमान चेन्नईला पोहोचले तेव्हा विमानात 37 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली.  
 
मलेशियाहून चेन्नईला येणा-या फ्लाइटमध्ये मरण पावलेली महिला तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चेन्नईला आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानात हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Edited By- Dhanashri Naik