शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (14:07 IST)

चालत्या ट्रेनमधून तरुणाला बाहेर फेकले ,सहप्रवासी व्हिडिओ बनवत होते

पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये एका तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्याची घटना समोर आली आहे. ट्रेनमधून दोन तरुण प्रवास करत असताना त्यांच्यात वाद झाला. प्रकरण हाणामारीत पोहोचले. यानंतर आरोपींनी तरुणाला धक्काबुक्की केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
 
दोघांमध्ये आधी कशावरून तरी वाद होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर दोघेही उठून ट्रेनच्या दाराजवळ जातात. काही वेळातच हे प्रकरण हाणामारीत जाते. दरम्यान, दोघांपैकी एकाला राग येतो आणि त्याने भांडण करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले. मग तो आपल्या सीटवर येऊन बसतो. यादरम्यान इतर प्रवासी व्हिडिओ बनवत राहतात, मात्र भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
 
ही घटना शनिवारी बीरभूम जिल्ह्यातील तारापिठ रोड आणि रामपुरहाट रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. हावडा ते मालदा या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये लोक प्रवास करत होते. त्यानंतर या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. संतापलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्याला ट्रेनमधून फेकून दिले.
 
पोलिसांनी सांगितले की, सजल शेख असे जखमी तरुणाचे नाव असून तो बीरभूममधील रामपूरहाटचा रहिवासी आहे . रेल्वे पोलिसांना सजल रक्तबंबाळ अवस्थेत रुळावर सापडला असून रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू आहे.
Edited By - Priya Dixit