बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गांधी कुटुंबाचे विश्वासू कमलनाथ का आहे खास

मध्यप्रदेशात 15 वर्षांनंतर विजय मिळवल्यावर येथे सत्ता देण्यासाठी ज्यांच्यावर राहुल गांधींनी विश्वास टाकला ते आहे छिंदवाडा येथील खासदार कमलनाथ. संजय गांधींचे जिवलग मित्र आणि गांधी कुटुंबाच्या प्रत्येक कठिण दिवसांत त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असलेले कमलनाथ यांचा जन्म कानपुरमध्ये झाला आहे.
 
मध्यप्रदेशात काँग्रेसची वापसी करण्यासाठी स्वत: झोकून दिलेल्या या नेत्याचे सीएमच्या खुर्चीवर बसणे काही गैर नाही. 18 नोव्हेंबर 1946 साली यांचा जन्म एका व्यावसायिक कुटुंबात झाला असून देहरादूनच्या दून स्कूलमध्ये यांचे शिक्षण झाले. नंतर कोलकताच्या सेंट झेवियर कॉलेजहून उच्च शिक्षा प्राप्त केली आहे. पक्षाला जुळल्यानंतर इंदिरा गांधींनी यांना छिंदवाडा येथील उमेदवार म्हणून पाठवले होते आणि यानंतर त्यांनी कधी वळून बघितले नाही. कानपूरचे कमलनाथ कधी मध्यप्रदेशाचे झाले हे आठवत नाही. आश्चर्य म्हणजे छिंदवाड्याहून ते नऊ वेळा खासदार म्हणून निवडले गेले.
 
संजय गांधी आणि कमलनाथ यांची मैत्री दून शाळेपासून होती. या मैत्रीमुळे या गांधी कुटुंबाच्या जवळचे झाले. ते नेहमी संजयसोबतच दिसायचे. संजय यांचा मृत्यू झाल्यावर इंदिरा गांधींसाठी तो काळ अत्यंत कठिण होता. राजीव गांधी यांना राजकारणात फारसा रस नव्हता. पक्ष कमजोर पडत होता. अशात कमलनाथ यांनी छिंदवाडाहून उमेदवार म्हणून राजकारणात पाय ठेवला.
 
वयाच्या 34 व्या वर्षी शानदार विजय मिळवून लोकसभेत पोहचले. नंतर त्यांनी कधीच वळून बघितले नाही. येथून ते 9 वेळा जिंकले, तरी 1997 मध्ये त्यांना एकदा सुंदरलाल पटवा यांनी पराभूत केले होते. खरं तर हवाला कांड यात नाव आल्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी अलका नाथ यांना तिकीट मिळाले असून त्याही विजयी झाल्या होत्या. परंतू एका वर्षानंतर त्यांना क्लीन चिट मिळाल्यावर ते पुन्हा निवडणुकीला सामोरा गेले परंतू पटवासमोर पराभूत झाले. हाच एकमेव काळ होता जेव्हा त्यांना पराभव सहन करावा लागला. 2014 मध्ये मोदी लहर असून देखील ते जिंकले होते.
 
UPA 2 मध्ये कमलनाथ रस्ते वाहतूक मंत्री बनले तसेच 2011 मध्ये त्यांना अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरी देण्यात आली. 
 
छिंदवाडाच्या लोकांना इंदिरा गांधींनी कमलनाथ यांची ओळख त्यांचा तिसरा मुलगा असल्याची करवून दिली होती. नंतर इंदिरा के दो हाथ, संजय गांधी और कमलनाथ हा नारा देखील तोंडातोंडी ऐकायला मिळत असे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमलनाथ यांची स्वीकृती आणि आपली राजकारणातील कौशल्यामुळे ते UPA-2 सरकारमध्ये देखील सोनिया गांधी यांचेदेखील विश्वासू बनले.