शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (11:50 IST)

आसाममध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीने तलावात उडी घेत केली आत्महत्या

water death
आसाम मधील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी शनिवारी सकाळी पोलीस कस्टडीमधून फरार झाला. तसेच त्याने नागांव जिल्ह्यातील धिंग मध्ये एका तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. तसेच क्राईम सीनचा पत्ता लावण्यासाठी सकाळी साढे तीनच्या सुमारास अपराधस्थळावर नेण्यात आले होते. 
 
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पोलीस कस्टडीमधून फरार झाला व तलावात उडी घेत त्याने आत्महत्या केली. तसेच तात्काळ शोध अभियान सुरु करण्यात आले. व दोन तासानंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. 
 
धिंग मध्ये गुरुवारी संध्याकाळी तीन जणांनी 14 वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. हे मुलगी त्यावेळी ट्युशन आटपून घरी जात होती. 
 
आरोपींनी पिडीताला जखमी अवस्थेत रस्त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या तलावाजवळ टाकून दिले. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणात दोन व्यक्तींना अटक केली त्यातील एकाने सकाळी आत्महत्या केली तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik