शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (10:26 IST)

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका

ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असून याचा फटका दिल्लीतील पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. सी. रंधवा, पोलीस उपायुक्त पी. मिश्रा, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. पी. मिश्रा, डीसीपी संजीव भाटिया आणि स्टाफ ऑफिसर राजीव रंजन यांचा समावेश आहे. या पाचही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
 
केंद्र सरकारने दिल्लीची बिघडलेली परिस्थिती सुधारवण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानतंर डोवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला आपला अहवाल सादर करणार आहेत. एकूण त्यांच्याकडे दिल्लीची कायदा व सुव्यवस्था रुळावर आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांना देखील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
पोलीस हेडकॉनस्टेबल आणि आयबी अधिकाऱ्याचा मृत्यू
२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीच्या जाफराबाद, मौजपूर, चांदपूर यांच्यासह उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये पोलिसांना दंगरखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.