बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (08:36 IST)

जास्त सामान काहून नेणाऱयांकिरोधात रेल्वेकडून कारवाई

रेल्वेच्या लांबपल्ल्यांच्या गाड्यामध्ये नियमांपेक्षा जास्त सामान काहून नेणाऱयांकिरोधात पश्चिम रेल्केने कठोर कारकाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८ ते २२ जूनपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांना सोबत वाहून नेता येणाऱया सामानाच्या वजनाबाबतच्या रेल्वेच्या नियमांची समुपदेशनाद्वारे संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
 
मेल-एक्प्रेसमध्ये प्रत्येक श्रेणीनुसार सामान वाहून नेण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. यात एसी पहिल्या वर्गासाठी सोबतच्या सामानाची ७० किलो वजनाची मर्यादा असून त्यावर अतिरिक्त १५ किलो वजनाची सूट दिली जाते. मात्र त्याहून अधिक सामान असल्यास त्यासाठी जादा रक्कम मोजून १५० किलोपर्यंत सामान नेता येते, मात्र १५० किलोहून अधिक सामान सोबत नेता येत नाही.
 
एसी टू-टीयर स्लीपर-पहिल्या वर्गात ६० किलोपर्यंतच्या सामानासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जादा पैसे भरून १०० किलोपर्यंत सामानाची वाहतूक करता येते. एसी थ्री टीयर-एसी चेअर कारमध्ये ५० किलो, स्लीपर श्रेणीमध्ये ५० किलो वजनासाठी कोणताही आकार नाही. त्याहून आणखी ३० किलोपर्यंत सामान वाहून नेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. सेकंड क्लासमध्ये ४५ किलोपर्यंतच्या सामानासाठी कोणतीही रक्कम आकारली जात नसून त्यापुढे ७० किलोपर्यंत जास्त वजनाचे सामान नेण्यासाठी जादा शुल्क द्यावे लागते.