शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मे 2022 (17:03 IST)

अनिल परबानंतर सोमय्यांचा ठाकरे परिवाराकडे मोर्चा, दिला थेट इशारा

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब  यांना एक दिवस जेलमध्ये जावे लागणार असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी अनेकदा केला आहे. दरम्यान आज अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई  केली. यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर  निशाणा साधला. अनिल परबांचे अनेक घोटाळ्यांशी संबंध आहेत. १०० कोटींच्या वसुली घोट्याळ्यात परबांचा हात आहे.त्यामुळे त्यांनी आता बॅग भरावी असा इशारा सोमय्या यांनी दिला.
 
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना ते म्हणाले, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर सीआरझेडमध्ये ही बांधकाम झालं. मात्र ते सीआरझेड नाही गावचा रस्ता आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. सीए सदानंद कदम ने सांगितलं की सव्वासात कोटीचं काम झालं, तसे सर्टिफिकेट दिलं. सव्वासात कोटी रोख मध्ये खर्च झाले. मात्र हे पैसे बजरंग खरमाटेचे पैसे आहेत की सचिन वाझेचे? असा सवाल करत हा तर क्राईम मनी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आता नंबर सदानंद कदमांचा लागणार असून हा अनिल परब यांचा साथीदार आहे. कदम हे अनिल परब यांचा केबल बिजनेस मध्ये पाटनर आहे. त्याच्या घरात कोट्यावधी रुपये आढळले आहेत. आता अनिल परब जेलमध्ये जाणार असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. यानंतर या सगळ्यांचे धागेदोरे ठाकरे परिवार पर्यंत जात असल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे.
 
अनिल परब ईडी छापा
आज सकाळी ईडीने अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थान शिवालय मध्येही छापे मारले. यावेळी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.ईडीचे अधिकारी शिवालय बंगल्यात असून, ईडीचे असिस्टंट डायरेक्टर ऑफ ईडी तासीन सुलतान सध्या शिवालय बंगल्यात आहेत. तासीन सुलतान हे अनिल देशमुख यांच्या मनी लाॅड्रिंग प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. परब यांच्या दापोली रिसॉर्ट संदर्भात आयकर विभागाने जो तपास केला होता त्यादरम्यान असं आढळले होत की, या रिसॉर्टच्या बांधकामासाठी तब्बल 6 कोटी खर्च करण्यात आले होते. 2017 ला या रिसॉर्टच्या जमिनीची खरेदी झाली आणि 2019 ला त्याची नोंदणी करण्यात आली अस इन्कम टॅक्सने म्हटलं होतं.या प्रकरणात मुंबईतल्या एका केबल व्यवसायिकाचंही नाव होतं