1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Again bomb threat in 30 planes emergency landing of three planes

पुन्हा 30 विमानांमध्ये बॉम्बची धमकी, तीन विमानांची इमर्जन्सी लँडिंग

देशातील अनेक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, धमक्या खोट्या असल्या तरी आम्ही त्या हलक्यात घेऊ शकत नाही.
 
तसेच सोमवारी रात्री इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या 30देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना पुन्हा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या धमक्यांमुळे जेद्दाहून जाणारी इंडिगोची तीन उड्डाणे सौदी अरेबिया आणि कतारमधील विमानतळांवर वळवण्यात आली. तर एका आठवड्यात, इंडियन एअरलाइन्सच्या 120 हून अधिक फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे.   
 
नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, धमक्या खोट्या असू शकतात, परंतु आम्ही त्यांना हलके घेऊ शकत नाही. अशा धमक्या देणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विमान सुरक्षा नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळली