सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (11:44 IST)

पुन्हा 30 विमानांना बॉम्बची धमकी, इंडिगो-विस्तारा आणि एअर इंडिया अलर्ट

indigo vistara
आठवड्याभरापासून भारतीय विमान कंपन्यांच्या 120 पेक्षा अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले की बॉम्बच्या धमक्या अफवा आहे, परंतु त्यांना हलक्यात घेता येणार नाहीत.
 
मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील विविध विमान कंपन्यांच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या अनेक दिवसांपासून येत आहे. सोमवारी रात्री देखील 30 विमानांना बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
तसेच सोमवारी रात्री इंडियन एअरलाइन्सच्या 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे.
 
गेल्या आठवड्यात भारतीय विमान कंपन्यांच्या 120 पेक्षा अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. सरकार विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्यांचा सामना करण्यासाठी कायदेशीर कारवाईची योजना आखत आहे. 

Edited By- Dhanashri Naik