एअर इंडियानंतर इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी, तपास सुरू
इंडिगोच्या 2 विमानांना बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यापुर्वी एयर इंडियाच्या विमानाला बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार एयर इंडिया नंतर आता इंडिगोच्या दोन विमानांना बॉंम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. आनन-फानन मध्ये या विमानांची सुरक्षा चौकशी सुरु करण्यात आली आहे. पहिले विमान मुंबई वरून जेद्दाह येथे जात होते. तर दुसरे विमान मुंबई वरून मस्कट जात होते. या दोन्ही विमानांना बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. आनन-फानन मध्ये दोन्ही विमानांची चौकशी सुरु आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे की, मुंबई वरून मस्कट येथे जाणारी फ्लाइट 6E 1275 ला बॉंम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.
पहाटे, एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली, ज्यामुळे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik