रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (16:09 IST)

एअर इंडियाला महिनाभरात दुसऱ्यांदा दंड, DGCAने लावला 10 लाखांचा दंड

air india
नवी दिल्ली. एअर इंडियाच्या AI 142 पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये वॉशरूममध्ये सिगारेट ओढणे आणि सीटवर लघवी करणे यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी एअरलाइन्सवर कठोर कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियावर डीजीसीएला घटनेची माहिती न दिल्याचा आरोप आहे. ही घटना 6 डिसेंबरची आहे.
 
यापूर्वी, हवाई वाहतूक नियामक DGCA ने न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट दरम्यान एका प्रवाशाने महिला सह-प्रवाशावर लघवी केल्याच्या घटनेच्या संदर्भात एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. 20 जानेवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) म्हटले होते की त्या विमानाच्या पायलट-इन-कमांडचा परवाना देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
 
यासोबतच त्यांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या घटनेच्या संदर्भात कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.