शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , शनिवार, 13 जुलै 2019 (14:05 IST)

अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी स्थगित

फुटिरतावाद्यांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये बंद पुकारल्याने अमरनाथ यात्रा शनिवारी एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना जम्मूवरुन काश्‍मीर खोऱ्याकडे जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. बंदमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन भाविकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
13 जुलै हा दिवस जम्मू आणि काश्‍मीर राज्यात शहीद दिवस म्हणून पाळण्यात येतो. याच दिवशी 1931 मध्ये डोग्रा महाराजाच्या सैन्याने श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाबाहेर गोळीबार करीत अनेक काश्‍मीरी नागरिकांचे प्राण घेतले होते. या शहीदांनी आठवण म्हणून आजच्या दिवशी राज्यात फुटिरतावादी नेत्यांनी बंद पुकारला आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील घटनास्थळी जाऊन या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांनी राज्यापालांवर कठोर टीका केली. ते म्हणाले, जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल हे भाजपाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांनी या स्मृतीस्थळाला भेट दिलेली नाही.